मावळत एक वेगळाच उपक्रम बजरंग दल व दुर्गा वाहिनी कडून सैनिकांसाठी रक्षाबंधन
पुणे मावळ – भारतात रक्षाबंधन हा सण आनंदाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते व राखी बांधते.
हिंदू संस्कृतीतला हा सण भाऊ व बहिणीचा प्रेम व्यक्त करण्याचा सण. पण या दिवशी सिमेवर असलेल्या सैनिकांना घरी जाऊन हा सण साजरा करता येते नाही. त्यामुळे सैनिकांना हा सण साजरा करता यावा म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवणार आहे.
जो भाऊ आपल्या देशाच्या रक्षणासाठी सिमेवर असतो. त्यांस हा सण साजरा करता येते नाही. किवा आपल्या गावी जाता येते नाही, बहिणीला भेटता येत नाही. पण या सैनिकांनी हा सण साजरा करता यावा म्हणून विश्व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनी यांच्या माध्यमातून हजारो राख्या तालुक्यातून गोळा करून सिमेवरील जवानांना पाठवणार आहे या साठीचे नियोजन बजरंग दल करणार आहे. तसेच या उपक्रमाच्या प्रमुख अर्पिता फाकटकर यांनी समाजातील माता भगिनींना संकलन केंद्रावर राख्या जमा करण्याचे व बहिणीचे कर्तव्ये पार पाडण्यासाठी अवाहन केले आहे.