मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण मदत व पुनर्वसन विभागाची माहिती

मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळपीके, भाजीपाला, गहू