BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मानीव अभिहस्तांतरण दस्तांच्या अभिनिर्णय पूर्वतपासणीसाठी पुणे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे विशेष अभियान

Summary

मुंबई, दि. २७ : मानीव अभिहस्तांतरण दस्ताच्या अभिनिर्णयाच्या अनुषंगाने सहकारी गृहरचना संस्थांकडील कागदपत्रांची पूर्व तपासणी तसेच कागदपत्रांसंबंधी संस्थांच्या शंका व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले जात आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा […]

मुंबई, दि. २७ : मानीव अभिहस्तांतरण दस्ताच्या अभिनिर्णयाच्या अनुषंगाने सहकारी गृहरचना संस्थांकडील कागदपत्रांची पूर्व तपासणी तसेच कागदपत्रांसंबंधी संस्थांच्या शंका व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले जात आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे शहर या कार्यालयामार्फत २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आले असून अभिनिर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचा सहकारी गृहरचना संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा कालावधी २७ ते ३० सप्टेंबर २०२५ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० असा असून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, ५-फायनान्स रोड, फोटोझिंको प्रेसच्या मागे पुणे-४११००१ या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असेल.

या कालावधीत प्रतिदिन २५ ते ३० संस्थांची कागदपत्रे तपासण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे संस्थांनी अभियानापूर्वी सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयात समक्ष किवा jdr.punecity@gmail.com या ईमेल आयडीवर सहभाग नोंदविणे आणि वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. सहभाग नोंदणीसाठी संस्थेचे नाव, पत्ता, सहभागी होणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि संपर्क क्रमांक कळवावेत. नोंदणीनंतर उपलब्धतेनुसार व संस्थेच्या सोयीनुसार दिनांक व वेळ आरक्षित करुन संस्थेस कळविण्यात येईल.

अभियानाचे स्वरूप, व्याप्ती आणि सोबत आणावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच संपूर्ण प्रगटन पाहण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन’ आणि ‘नागरिकांसाठी’ या सदराखाली माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सह जिल्हा निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालये हवेली क्र.१ ते २७ यांच्याकडे देखील माहिती उपलब्ध असून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी सुरू केलेल्या या सेवेचा जास्तीत जास्त संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे तसेच सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी केले आहे.

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *