मानाटेकडीवर माघ पौर्णिमा समारोह संपन्न.
धम्मगिरी बहुउद्देशिय वन उद्यान विकास समिती , मानाटेकडी ( जमणजेट्टी जवळ ), चंद्रपूर तर्फे आयोजित माघ पौर्णिमा समारोह आज दिनांक 12 फेब्रु. ला उत्साहात संपन्न झाला आहे. काही वर्षापूर्वी सदर मानाटेकडीवर संभावित सातवाहन काळातील अखंड दगडात कोरलेली बुद्धमूर्ती सापडली. त्याच्या पूर्वेला अगदी जवळच ‘ पंचगुफा ‘ म्हणून नोंद असलेले भिखू निवास सुद्धा आहे. यावरून मानाटेकडी हे तत्कालीन बुद्ध धम्माचे विज्जासन लेणीसारखे एक केंद्र नक्कीच राहिले असावे .परंतु भारत सरकार आणि पुरातत्व विभागाच्या हेतूपुरस्पर दुर्लक्षितपणामुळे हे स्थळ wcl च्या डम्पिंगखाली बऱ्यापैकी दाबल्या गेले आहे . परंतु काही वर्षांपूर्वी येथे बुद्धमूर्ती सापडल्याने या टेकडीवर या मूर्तीची प्रतिष्ठापणा करून माघ पौर्णिमेचा समारोह साजरा केल्या जात आहे . यासाठी चंद्रपूरातील काही बौद्ध अनुयायांनी पुढाकार घेऊन धम्मगिरी बहूउद्देशिय वन उद्यान विकास समिती ची स्थापना केली व या स्थळाला प्रकाशात आणले . मध्यंतरी काही काळ येथे समारोहाच्या आयोजनात खंड पडला होता , परंतु मान. दिलीपजी वावरे यांचेसारख्या कर्तव्यदक्ष व्यक्तीकडे या समितीचे अध्यक्षपद सोपवून समितीने या परिसराचा विकास घडवून आणण्याचा चंग बांधला आहे .
या अंतर्गत आजचा माघ पौर्णिमा समारोह मान. दिलीपजी वावरे यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला . महावितरण च्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांचे हस्ते या समारोहाचे उदघाटन करण्यात आले .प्रा. स्निग्धा रत्नपारखी, आयु. ज्योती सहारे, बानाई चे सचिव इंजि. किशोर सवाने, थेंब ग्रुपचे एड. राजेश वनकर, माजी. नगरसेवक राजेंद्र आखरे, चेतन उंदीरवाडे, देवेंद्र गायकवाड इ. नी याप्रसंगी मार्गदर्शन केले . प्रस्ताविक फाल्गुन गेडाम , संचालन नम्रता वावरे तर आभार व्यक्त मधुकर वाहणे यांनी केले . या प्रसंगी बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष मान. बंडूभाऊ उपाख्य नागवंश नगराळे यांचेसोबत विवेक कांबळे, बंडू ठमके, सिद्धांत पुणेकर, निलजय गावंडे इ. पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर महानगरातील अनेक बौद्ध मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
या परिसराचा विकास करण्यासाठी रस्ता, विज व पाणी या मूलभूत सोयी प्रथम उपलब्ध करण्याकरिता कसोसीने प्रयत्न करू असा मानस यावेळी दिलीपजी वावरे यांनी व्यक्त केला .
