आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत हे प्रभावी माध्यम – डॉ. संतोष बोराडे

Summary

मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, कार्यक्षमतेत वाढ, मानसिक शांतता आणि आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक […]

Oplus_131072

मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, कार्यक्षमतेत वाढ, मानसिक शांतता आणि आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक डॉ. संतोष बोराडे यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘जीवन संगीत’ या विषयावर डॉ. संतोष बोराडे यांचे व्याख्यान झाले.

डॉ. संतोष बोराडे म्हणाले, तंत्रज्ञान म्हणजे केवळ यंत्र नाही, तर जीवन जगण्याची आधुनिक पद्धती आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्यास जीवन अधिक सुलभ आणि आनंददायी होऊ शकत. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे हे जिवंतपणाच लक्षण आहे.

Oplus_131072

संगीतामध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद असते. चांगले संगीत मनाला उभारी देते, विचारशक्ती प्रगल्भ करते आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द निर्माण करते. अनेकवेळा जीवनातील तणाव, नैराश्य, किंवा अडचणींच्या वेळी संगीतच माणसाला मानसिक आधार देते.

डॉ. बोराडे यांनी या सत्रात ओव्या, गीत आणि संगीताच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. तंत्रज्ञान हे सतत अद्ययावत राहण्याची प्रक्रिया आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती अंगीकारली, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही समृद्ध होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *