माधव टॉवर महिला शारदा उत्सव मंडळ येथील महिलांना पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क कडून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

चंद्रपूर :- दाताळा जवळील माधव टॉवर महिला शारदा उत्सव मंडळ येथे दिनांक 12/10/2024 दसऱ्यानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चंद्रपूर तर्फे महिलांचा सन्मान म्हणून महिलांना सन्मानपत्र देऊन सन्माननित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. राजकुमार खोब्रागडे पोलीस योद्धा न्यूज चॅनल चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. मनोज चतुर साहेब, शशांक देव हे उपस्थित होते. मा. खोब्रागडे साहेबांनी महिलांना कायदेविषयक माहिती दिली, मा. चतुर साहेबांनी महिलांना आरोग्यविषयी माहित सांगितली त्या प्रमाणे सामाजिक बांधिलकी कशी जोपासता येईल या विषयी देव साहेबांनी सांगितले तसेच या कार्यक्रमात माधव टॉवर येथील सर्व रहिवासी उपस्थित होते.