महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री शंभूराज देसाई

Summary

मुंबई, दि. 13 :  माथाडी कामगारांना  मुंबईतील दवा बाजार, लोहार चाळ या परिसरात वाहतुकीच्या संदर्भात अनेक अडचणी येतात. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व गृह विभागाने पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज मंत्री […]

मुंबई, दि. 13 :  माथाडी कामगारांना  मुंबईतील दवा बाजार, लोहार चाळ या परिसरात वाहतुकीच्या संदर्भात अनेक अडचणी येतात. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व गृह विभागाने पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगार संघटनेच्या वाहतुकीच्या संदर्भातील मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.

मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी माथाडी कामगार संघटनेच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. पार्किंग, हातगाडी वाहतुकीचे नियम व अटी याबाबत चर्चा केली.

या बैठकीस सह पोलीस आयुक्त प्रविणकुमार पडवळ, पोलीस उपायुक्त (वाहतूक) गौरव सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उ.बा.चंदनशिवे, माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *