माता आणि गुरुजनांच्या शिस्तीतून आदर्श विद्यार्थी घडतात डॉ गणेश डाखळे माजी विद्यार्थी डॉ डाखळे कडून जि प प्राथमिक शाळेला एख लाखाची देणगी
Summary
कोंढाळी -वार्ताहर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरखेडा येथे स्वातंत्र्याचा ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी , सरपंच -उपसरपंच ग्रा .प. सदस्य,पालक व गावातील नागरिक यांच्या सहभागाने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. प्राथमिक शाळेतील ध्वजारोहणा नंतर ग्राम पंचायत […]

कोंढाळी -वार्ताहर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरखेडा येथे स्वातंत्र्याचा ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी , सरपंच -उपसरपंच ग्रा .प. सदस्य,पालक व गावातील नागरिक यांच्या सहभागाने गावात प्रभात फेरी काढण्यात आली.
प्राथमिक शाळेतील ध्वजारोहणा नंतर ग्राम पंचायत चे ध्वजारोहणाकरिता याच प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर चे अधिष्ठाता (परिक्षा) डॉ गणेश नत्थुजी डाखळे यांच्या हस्ते घेण्यात आला.ध्वजारोहणा सोबतच नव्याने बांधण्यात आलेल्या हुतात्मा शीला फलकाचे अनावर ही अधिष्ठाता डॉ गणेश नत्थुजी डाखळे यांच्या हस्ते घेण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषणा नंतर सरपंच विठ्ठल ऊके, उपसरपंच सुदर्शन झोडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गणेश डाखळे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील शिक्षण ही फार मोलाचे आहे .ते स्वतः ते व त्यांचे दोन्ही बंधू कैलास डाखळे,व पंढरीनाथ डाखळे याच शाळेतून शिक्षण घेतले असून माजी मुख्याध्यापक आनंदराव काकडे गुरूजी आई विमलताई डाखळे तसेच वडिल नत्थुजी डाखळे यांच्या शिस्तप्रिय मार्गदर्शना मुळे ते स्वतः एम्स् नागपूर चे अधिष्ठाता (परिक्षा), मोठे बंधू कैलास डाखळे आय- आय-आय-टी -नागपूर चे कुलसचिव, तर थोरले बंधू पंढरी डाखळे कृषी निदेशक गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
याप्रसंगी बोलताना सांगितले की डाखळे कुटूंबियांनी त्यांच्या मातोश्री स्व विमलताई नत्थुजी डाखळे यांच्या स्मरणार्थ मुलींना
शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून जि प प्राथमिक शाळा
धुरखेडा या शाळेला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. या देणगी चे व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून या शाळेमधून चौथ्या वर्गात प्रथम येणाऱ्या मुलीला ती व्याजाची रक्कम देण्याचे जाहीर केले. त्या नुसार वर्ष २०२२-२०२३मधे या शाळेतून चौथ्या वर्गात प्रथम आलेल्या कुमारी —हरिष कोहळे हिला पाच हजार रूपयाचे बक्षिस देण्यात आले. यापुर्वी ही माजी सरपंच नत्थुजी डाखळे यांनी असे पुरस्कार देत असत तिच परंऐ डॉ गणेश डाखळे व त्यांच्या बंधु कडून चालविली जात आहे. या प्रसंगी त्यांनी व त्यांच्या बंधुनी माध्यमिक शिक्षण कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल मधुनच घेतले व त्यांच्या शिकवणार्या शिक्षकांचे गुणगौरव केले. कार्यक्रमा आभार ग्रा प सदस्य पवन पेंदाम यांनी मानले.