माणुसकीला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या

माणुसकीला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या
पुणे (मावळ) -मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या नराधामाला फाशी व्हावी यासाठी आज दि.०७/०८/२०२२ रोजी जन आंदोलन पवना नगर येथे करण्यात आले .
मावळ तालुक्यात कोथुर्णे गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून स्वराला न्याय मिळावा यासाठी आज दि.०७/०८/२०२२ रोजी जन आंदोलन पवना नगर येथे करण्यात आले .यावेळी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र भाजपा-सौ.चित्राताई वाघ, मा. राज्यमंत्री-मा.ना.श्री.संजय बाळाभाऊ भेगडे, मा.सभापती-सौ.निकीताताई निकिताताई घोटकुले,तसेच इतर युवक, युवती,महिला भगिनी उपस्थित होत्या.
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी कोथूर्णे (ता. मावळ) या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेने पिढीत परिवाराशी शनिवार (दि. ६) रोजी साडेआठ वाजता संवाद साधताना केले.
यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना निर्भयावर झालेल्या अत्याचार व हत्येच्या दुर्दैवी कारणामुळे मला आपल्या गावात येण्याची वेळ आली आहे. कुटुंबाशी संवाद साधला असता ते गरीब कुटुंब पूर्णपणे भेदरले असून पोलीस तपास करत आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे निवेदन मिळाले आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणाची होणाऱ्या अधिवेशनात विधिमंडळात मांडणी करून हि केस फास्टट्रॅक पद्धतीने चालण्यासाठी प्रयत्न करणार, तर सर्वात चांगला सरकारी वकील मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार आहे. आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी कठोर कायदे केलेले आहेत. परंतु तरी देखील असे दुर्देवी प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात