माझी माती माझा देश या अभियानातील अभिनव कार्यक्रम आदर्श ग्राम पंचायतीने मानांकित ग्राम पंचायत खुर्सापार मध्ये साजरा माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख व जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

कोंढाळी -वार्ताहर
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘माझी माती माझा देश’ अभियान देशात सर्वत्र साजरा होत आहे. हा उपक्रम 01 ते 015ऑगस्ट या कालावधीत साजरा होत असून यामध्ये शिलाफलक पुजन, अमृत सरोवर पाहणी, अमृत वाटीकेत वृक्षारोपण,वसुधा पुजन, वीरांना वंदन, पंचप्रण शपथ, ध्वजारोहन अशी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना लोकाभिमुख करुन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या सूचना माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी दिली, सोबतच शिक्षकां अभावी आदिवासी बाहूल क्षेत्रातील हिंस्र वन्यजीवांचा वावर असलेल्या गावांच्या बंद पडलेल्या शाळांनां शिक्षक नियुक्त करावे अश्या सुचना ही याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, बी इ ओ नरेश भोयर यांना केल्या.
त्याच प्रमाणे विभागीय उपायुक्त (विकास) डॉ कमलकिशोर फुटाणे, काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे, सरपंच सुधीर गोतमारे,उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांनी ही गावोगावी अमृत महोत्सवी सांगता वर्षाचे आयोजन करून समृद्ध, सुदृढ़, देश बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा हेतू सफल करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध असल्याचे या प्रसंगी सांगितले. त्याच प्रमाणे माजी सैनिक गजाननराव यावलकर, तसेच रमेशराव कुंभारे यांच्या सत्कार ही आमदार अनिल देशमुख यांचे हस्ते करण्यात आला.
14ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आदर्श ग्राम पंचायत- खुर्सापार येथे सकाळी ०९वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज तसेच थोर महा पुरुषांचे प्रतिकात्क पेहरावा करून गावात तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच साकाळी10वाजता ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे, जिलापरिषद सदस्या पुष्पाताई चाफले,उपसभापती निशिकांत नागमोते, माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, माजी उपसभापती अनुराधा खराडे, पं स सदस्य अरुण ऊईके, चंदाताई देव्हारे, लताताई धारपुरे , शिवाजी जामदार,बी डी ओ दिपक गरूड, नायब तहसीलदार संजय भुजाडे, जी एस डी एल च्या वर्षा माने , गावंडे,तसेच पंचायत समिती राजस्व , शिक्षण, कृषी आरोग्य, पंचायत विभागांसह काटोल तालुक्याअंतर्गत सर्व विभागांचे प्रमुख, खुर्सापार ग्राम पंचायतीचे उपसरपंच ——–तसेच सर्व सदस्य
तसेच खुर्सापार ग्राम पंचायत अंतर्गत येणार्या गावांचे जेष्ठ, युवक महिला पुरूषांचे उपस्थितीत माझी माती माझा देश विरांना वंदन या कार्यक्रम प्रसंगी आदर्श ग्राम पंचायत खुर्सापार चे सरपंच सुधीर गोतमारे, यांनी प्रास्ताविक, संचलन स. शि. धवड/ प्रधानाचार्य दिलिप वैद्य तर आभार ग्राम सचीव जया पाटील यांनी व्यक्त केले.