माजी मंत्री कै. दादासाहेब पालोदकर यांची जयंती साजरी

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे सहकार महर्षी माजी मंत्री कै. माणिकराव ( दादा ) पालोदकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते माणिकराव ( दादा ) पालोदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रियदर्शनी चौक भागातील कै. माणिकराव ( दादा ) पालोदकर मार्गावरील नाम फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दादासाहेब पालोदकर यांच्या आठवणींना उजाळादेत त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
सेना भवन तसेच दादासाहेब पालोदकर मार्ग या दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुका प्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, मेघा शाह, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, संजय मुरकुटे आदिंची उपस्थिती होती.