माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधनाने देशाने आर्थिक क्रांती घडविणारा क्रांतीकारी गमावला आमदार चरणसिंग ठाकूर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने अभ्यासु प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ गमावला: आमदार चरण सिंग ठाकूर

कोंढाळी- 27 डिसेंबर-
भारताचे माजी पंतप्रधान जागतिक दर्जाचे तज्ञ अर्थ शास्त्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक अभ्यासू प्रशासक,व अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना काटोल चे आमदार चरण सिंह ठाकुर यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात चरणसिंग ठाकूर म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहेत. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी आम्ही प्रार्थना करतो.
काटोल विधानसभा(48) आमदार चरणसिंग ठाकूर