*माजी कॅबिनेट मंत्री मा. संजय बाबु देवतळे यांचे नागपूर येथे निधन.* *शांत, सुस्वभावी,सुसंस्कृत लोकांच्या मनावर राज्य करणारा अभ्यासू लोकनेता हरपला*. *त्यांच्या निधनाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी*

*त्यांच्या निधनाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी*
राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे माजी संपर्कमंत्री माननीय संजय बाबु देवतळे यांचे नागपूर येथे आज 25 एप्रिल रोजी दुपारी, कोरोना उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते.
प्राप्त माहितीनुसार मागील सात दिवसापासून ते नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती होते. आज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे ते चार टर्म आमदार होते. राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. साधे सरळ व्यक्तिमत्त्व , शांत ,सुस्वभावी, संयमी राजकारणी, मोठ्या मनाचा व जनतेच्या मनावर राज्य करणारा सुसंस्कृत लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली अतिशय शांतपणे व संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केले होते.
त्यांच्या निधनाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून दोन्ही जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र तर्फे माननीय संजय बाबु देवतळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर.