महाराष्ट्र हेडलाइन

माजी आमदाराचे पुत्र लॉरेन्स ने केली कर्तव्यावरील डॉक्टरास मारहाण – आरमोरी कोविड सेंटरमधील प्रकार – आरोपीला न्यायालयीन कोठडी.

Summary

गडचिरोली :- चक्रधर मेश्राम.विभागीय प्रतिनिधी आरमोरी स्थानिक तहसील कार्यालयानजीकच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये कार्यरत नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांना माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या बदमाश पुत्राने शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार 12 मे रोजी घडला. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरोपी […]

गडचिरोली :- चक्रधर मेश्राम.विभागीय प्रतिनिधी
आरमोरी स्थानिक तहसील कार्यालयानजीकच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये कार्यरत नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांना माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या बदमाश पुत्राने शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार 12 मे रोजी घडला. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरोपी लॉरेन्स आनंदराव गेडाम (20) यास अटक केली. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली होती तर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असून परिचारिका दिनी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याने या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध केला जात आहे.
आरमोरी उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कार्यरत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मारबते त्यांच्या सहकाऱ्यासह कोरोना रुग्णांची तपासणी व औषधी देण्याचे काम करीत असतांना 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास लॉरेन्स गेडाम याने कोरोना रुग्णाला औषधी देण्याच्या कारणावरून डॉ. मारबते यांच्याशी वाद घालून अश्लील शिवीगाळ केली. डॉ. मारबते यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली. याबाबत डॉ. मारबते यांनी दिलेल्या तक्रारीवरून लॉरेन्स आनंदराव गेडाम याच्याविरोधात आरमोरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353, 332, 294, 504 सह महाराष्ट्र मेडिकेअर पर्सन्स व मेडिकेअर इन्स्टीस्ट्युशन्स प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलॉस, लॉस, डॅमेज टु प्रॉपर्टी ऍक्ट 2019 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस 13 मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेनंतर
राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.
कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात टाकून सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर शुल्लक कारणांवरून हल्ला झाल्यामुळे सर्वच स्तरावरून या घटनेचा निषेध केला जात आहे. या घटनेतील आरोपी माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा पुत्र असल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
आरोपीच्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत असल्याने अशा आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे.
वैद्यकीय कर्मचा-यावर हल्ला प्रकरणातील आरोपी लॉरेन्स गेडाम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याचेवर मागील विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान एका उमेदवाराचा अपहरण केल्याप्रकरणी विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना मागील वर्षी याच आरोपीने शहरातील एका नामांकित विद्यालयात जाऊन एका प्राध्यापकास शिवीगाळ केली होती. परंतु त्या प्रकरणावर पांघरून घालण्यात आले होते. दरम्यान कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या डॉक्टरावर सदर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माजी आमदाराच्या पुत्राने शुल्लक कारणावरून हल्ला चढविल्याने त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे अशी माहिती बोंडसे यांनी दिली.
सदर प्रकरणाबाबत डॉ. अभिजित मारबते यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून साक्षदारांचे बयान नोंदवून आरोपीवर गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याची माहिती प्रकरणाचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक बोंडसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *