मागासवर्गीयांना पदोन्नती डावलण्यासाठी अर्हता बदलण्याचा घाट – डॉ.संजय बापेरकर
Summary
मुंबई अग्निशमन दलातील विविध संवंर्गातील कर्मचारी/अधिकार्यांना पदोन्नतीच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिका प्रशासनाने विहीत अहर्ता तयार केलेल्या आहेत. सदर अहर्तेनुसार मागासवर्गिय उमेदवारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण झाली की, संबंधित पदांच्या अहर्ता बदलण्यात येतात असा आरोप ‘बीएमसी एससी एसटी व्हिजेएनटी […]
मुंबई अग्निशमन दलातील विविध संवंर्गातील कर्मचारी/अधिकार्यांना पदोन्नतीच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिका प्रशासनाने विहीत अहर्ता तयार केलेल्या आहेत. सदर अहर्तेनुसार मागासवर्गिय उमेदवारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण झाली की, संबंधित पदांच्या अहर्ता बदलण्यात येतात असा आरोप ‘बीएमसी एससी एसटी व्हिजेएनटी ओबिसी एम्प्लॉईज असोसिएशन चे सरचिटणीस डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी केला आहे.
मागासवर्गिय उमेदवार ‘प्रमुख अग्निशमन अधिकारी’ पदावर बसता कामा नये म्हणुन तत्कालिन अतिरिक्त आयुक्त,श्रीमती मनीषा म्हैसकर यांनीही ‘उपप्रमुख अग्निशमन अधिकारी’ पदाची अहर्ता बदलली होती. असाच प्रकार “सब ऑफ़िसर” पदाच्या बाबतीत सध्या सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“सब ऑफ़िसर” संवंर्गाच्या पदोन्नतिसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसारित करुन, उमेदवारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. मात्र, पदोन्नतीच्या यादीमधील सेवाजेष्ट असणार्या ७ मागासवर्गिय उमेदवारांना “सब ऑफ़िसर” पदावर पदोन्नती मिळणार असल्याचे समजताच, मागासवर्गियांच्या विरोधात सातत्याने काम करीत असलेल्या एका कामगार संघटनेने अग्निशमन दल प्रशासनावर दबाव आणल्याने, “सब ऑफ़िसर” पदाच्या अहर्ता बदलण्याचा प्रस्ताव सादर केला गेला आहे.
मागासवर्गिय उमेदवारांना पदोन्नती पासुन वंचित ठेवण्यासाठी “सब ऑफ़िसर” पदासाठी असणारी 5 वर्षांची अट शिथिल करून, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमोशनसाठी ‘प्रपोजल’ तयार करून मागासवर्गियांवर अन्याय केला जात आहे. प्रमुख अग्निशामक पदावर एकुण 17वर्षे सेवा केलेल्या मागासवर्गिय उमेदवारांना डावलून, केवळ 1ते2वर्षे सेवा केलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पदोन्नती देणे म्हणजे मागासवर्गिय उमेदवारांवर अन्याय आहे.
त्यामुळे “सब ऑफ़िसर” संवंर्गाची विद्यमान अहर्ता कायम ठेऊन, मागासवर्गिय उमेदवारांना त्यांच्या हक्काची पदोन्नती देण्यात यावी व त्यांच्यावरील अन्याय दुर करावा अशी मागणी डॉ.संजय कांबळे-बापेरकर
यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.