BREAKING NEWS:
अहमदनगर आरोग्य महाराष्ट्र हेडलाइन

माईंड मॅनेजमेंट इज द लाईफ मॅनेजमेंट: मनाचे व्यवस्थापन हेच जीवनाचे व्यवस्थापन – ज्येष्ठ संमोहन तज्ञ डॉ जगदीश राठौड़

Summary

प्रतिनिधी अहमदनगर         नुकत्याच साईं कृपा इंस्टीट्यूट ऑफ़ मैनेजमेंट धारगाव येथे ज्येष्ठ संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठौड़ तज्ञ मार्गदर्शकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की माइंड मैनेजमेन्ट इज द लाइफ मैनेजमेन्ट.             सविस्तर वृत्त […]

प्रतिनिधी अहमदनगर
        नुकत्याच साईं कृपा इंस्टीट्यूट ऑफ़ मैनेजमेंट धारगाव येथे ज्येष्ठ संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठौड़ तज्ञ मार्गदर्शकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की माइंड मैनेजमेन्ट इज द लाइफ मैनेजमेन्ट.
            सविस्तर वृत्त असे की ज्येष्ठ सम्मोहन तज्ञ डॉ जगदीश राठौड़ मनाविषयी बोलत असताना एमबीए च्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्याण करताना मन कसं चंचल असतं व मनातील येणारे विचार हे असंख्य असतात. त्या विचारांपैकी योग्य व चांगले विचार कसे करावे व मनावरिल ताण-तणाव घालवून यशस्वी जीवन जगून आनंदित कसे राहावे याबाबत बोलत असताना डॉ राठौड़ यांनी सम्मोहनाची प्रात्यक्षिके करून समाज प्रबोधन व मनोरंजन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमबीए चे विभाग प्रमुख डॉ सचिन निंभोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विक्रम कांबळे, प्राचार्य डॉ. निंबाळकर, प्राचार्य डॉ. बेलेकर, प्राध्यापक डॉ. पंडित, डॉ. घालमे , डॉ. गोंडते, डॉ. संतोष शिंदे तसेच प्राध्यापक तरळे आणि प्राध्यापक फेंडके, प्राध्यापक साळवे, प्राध्यापिका राजश्री शिंदे, प्राध्यापिका संगीता जठार, प्राद्यापिका हराळ, प्राध्यापक शिंदे आणि प्राध्यापक दीपाली हराळ व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते. त्याप्रसंगी एमबीए चे विद्यार्थी हे मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजश्री शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक संगीता जठार मॅडम यांनी केले. अश्याप्रकारे कार्यक्रम थाटात संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *