BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

महिला किसान दिन 2021साजरा

Summary

गडचिरोली ( जिमाका ) दिनांक 22 ऑक्टोबर, 2021 रोजी कृषी विभागामार्फत राज्यभरात महिला दिन साजरा करण्यात आला. मा.मंत्री (कृषी) ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रम कृषी महाविद्यालय, धुळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी महाविद्यालय, धुळे […]

गडचिरोली ( जिमाका ) दिनांक 22 ऑक्टोबर, 2021 रोजी कृषी विभागामार्फत राज्यभरात महिला दिन साजरा करण्यात आला. मा.मंत्री (कृषी) ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रम कृषी महाविद्यालय, धुळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये मा.सौ.मंजुळाताई गावित (आमदार, साक्री विधानसभा), मा.श्री.दिलीप कर्पे (महापौर, धुळे), मा.जलदजी शर्मा (जिल्‍हाधिकारी, धुळे), मा.श्री.एकनाथ डवले (सचिव कृषि, महाराष्‍ट्र राज्‍य), मा.श्री.धीरजकुमार (आयुक्‍त कृषि, महाराष्‍ट्र राज्‍य), मा.श्री.सुभाष नागरे (संचालक, नियोजन व कृषि प्रक्रिया, कृषि आयुक्‍तालय, पुणे) श्री.संजीव पडवळ (विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक), श्री.सुनिल वानखेडे (विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक) इत्‍यादी मान्‍यवर उपस्थित होते. मा.मंत्री कृषि व उपस्थित महिला शेतकऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये धुळे जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन साखळी आणि उद्योजकता या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शेतकरी श्रीमती शोभाताई जाधव, श्रीमती प्रियंका जोशी व श्रीमती चंद्रकला वणी यांचा मा. मंत्री (कृषी) ना. दादाजी भुसे  यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर मा.श्री.धीरजकुमार (आयुक्‍त कृषि, महाराष्‍ट्र राज्‍य) यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍तविक केले. उपस्थित महिलांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. त्‍याचबरोबर मा. मंत्री (कृषी) ना. दादाजी भुसे यांनी राज्‍यातील सर्व कृषि विभागातील कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन साखळी या क्षेत्रामध्‍ये उत्‍कृष्‍ट काम करणाऱ्यां ९ महिलांशी ऑनलाईन पध्‍दतीने संवाद साधला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य या युटयुब चॅनेलवर लाईव्‍ह प्रसारित करण्‍यात आले.
    मा. मंत्री (कृषी) ना. दादाजी भुसे  यांचे हस्‍ते प्राति‍निधीक स्‍वरुपात हरभरा बियाणे वाटप करण्‍यात आले. श्री.सुनिल वानखेडे (विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक) यांनी कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन साखळी या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करू इच्छितात त्यांच्यासाठी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सुक्ष्‍म खाद्य उद्योग उन्‍नयन योजना (PMFME) या योजनेबाबत माहिती दिली
या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्‍यवर व मा.श्री.एकनाथ डवले (सचिव कृषि, महाराष्‍ट्र राज्‍य) यांनी महिला किसान दिनाच्‍या निमित्‍ताने शेतकरी बांधवांना  मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित शेतकरी बांधवांसाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली  त्याचा लाभ उपस्थित शेतकरी बांधवांनी घेतला. राज्यातील सर्व तालुक्यात तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करून यामध्ये तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी उद्योजिका आणि महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच जिल्हास्तरावर देखील अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कृषी प्रक्रिया मूल्यवर्धन साखळी या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील इतर महिला व शेतकरी बांधवांना उपलब्ध करुन देण्यात आले.
राज्यभरातून १९६७ ठिकाणी महिला किसान दिवस कार्यक्रम आयोजन झाले व त्‍या माध्‍यमातून जवळपास १,०५,५३० एवढया महिलांना व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
महिला किसान दिनाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रांमधील महिलांचे योगदान निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे सांगून मा.मंत्री महोदयांनी राज्यातील सर्व महिला शेतकरी भगिनींना महिला किसान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेती फायद्याची करायची असेल तर शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे,कृषी उत्पादनावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करणे व विपणनाची साखळी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी कृषी विभागाच्या यासंबंधी विविध योजना सुरू असून शेतकरी बांधवांनी विशेषतः महिला भगिनींनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे मा. कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी बांधवांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *