महावितरणच्या हलगर्जीपणामुळे युवकांचा मृत्यू सिल्लोड
(प्रतिनिधी )सय्यद सलीम सय्यद तालेब रा जोहोर कॉलनी सिल्लोड ही घराचा काम करीत असताना त्यांना ३३ केव्ही मोठय़ा लाईनचा शॉक लागल्यामुळे ती जागेवरच गतप्राण झाले महावितरण कंपनीला वारंवार निवेदन दिल्यानंतरही ३३ केव्ही लाईन बदलण्यात आलेली नाही त्यामुळे आज एक युवकांचं जीव गमवावा लागला सय्यद सलीम सय्यद तालेब हा घरातील एकटाच कमावणारा युवक होता त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर घरात आई २ बहिणी २ भाऊ असा परिवार आहे घरातील सर्व जिम्मेदारी ही सय्यद सलीम यांच्यावर होती दरम्यान सय्यद सलीमला शॉक लागल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी पंचनामा केला व महावितरण कंपनीने सय्यद सलीमला वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली दरम्यान नगरपरिषद व राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सय्यद सलीम यांना शासकीय मदत मिळून द्यावे असे त्यांचे घरच्यांचे म्हणने आहे