महाराष्ट्र हेडलाइन

महावितरणच्या अभियंते ,अधिकारी व कर्मचार्‍यांचे शासकिय रूग्णालयातर्फे लसिकरण

Summary

गडचिरोली— महावितरणच्या अभियंते, अधिकारी व कर्मचार्‍यांना वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी तसेच वीजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करतेवेळी सतत ग्राहकांशी संपर्क येतो. या कोरोना काळात वीजग्राहकांना सेवा देतांना बर्‍याच कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे व हजारोच्यावर कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय कोरोनाबाधित झालेले आहे. वीज कर्मचार्‍यांचे […]

गडचिरोली— महावितरणच्या अभियंते, अधिकारी व कर्मचार्‍यांना वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी तसेच वीजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करतेवेळी सतत ग्राहकांशी संपर्क येतो. या कोरोना काळात वीजग्राहकांना सेवा देतांना बर्‍याच कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे व हजारोच्यावर कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय कोरोनाबाधित झालेले आहे.
वीज कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत महावितरणकडून प्रशासकिय स्तरावरून तसेच वीज संघटनेमार्फत पाठपूरावा सूरु होता त्यास प्रतिसाद देत जिल्हा शासकिय रूग्णालय मार्फत आज दि. 31मे रोजी महावितरण प्रविभागीय कार्यालय गडचिरोली येथे सर्व अभियंता,अधिकारी, कर्मचारी तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचे लसीकरण, प्रभारी अधिक्षक अभियंता रविंद्र गाडगे,प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर तसेच प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गडचिरोली उपविभाग पुरूषोत्तम वंजारी यांचे मार्गदर्शनात शिबिर आयोजीत करण्यात आले.यासाठी सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील डाॅ. मडावी व डाॅ. देशमूख व त्यांची चमू यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात महावितरणचे कर्मचारी व त्यांचे 45 वर्षांवरील आई वडील तसेच बाह्यस्तोत्र कर्मचारी असे मिळून एकूण 100 जणांचे लसीकरण करण्यात आले.

प्रा शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *