महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

Summary

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या […]

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

दि. ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर आयोगाने सदर यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्पुरती असून, अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी अंती उमेदवारांच्या गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो किंवा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात.

या यादीवर अंतिम निर्णय विविध न्यायप्रकरणांवरील न्यायालयीन निकालांवर अवलंबून असेल. उमेदवारांनी आपला पद पसंतीक्रम दिनांक १० ते १६ मे २०२५ दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधेमार्फत नोंदवणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदवताना आयोगाने अधिसूचित केलेल्या सात संवर्गांपैकी निवड करावी, अन्यथा ‘No Preference’ विकल्प निवडावा. एकदा सादर केलेला पसंतीक्रम कालावधी नंतर बदलता येणार नाही. तसेच, पसंतीक्रम नोंदवले नसल्यास उमेदवारांच्या शिफारशीचा  विचार केला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *