महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेशपत्र उपलब्ध
Summary
मुंबई, १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन […]

मुंबई, १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांना ही प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात लॉगिन करून डाउनलोड करता येतील.
परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना व मार्गदर्शक तत्त्वे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात. सूचनांचे उल्लंघन केल्यास आयोग उमेदवारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यात अडचण असल्यास उमेदवारांनी contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा अथवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर आवश्यक ती मदत मिळवता येईल असे आयोगाने कळविले आहे.