महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ.निरूपमा डांगे रूजू
Summary
नवी दिल्ली, दि. 6 : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजू झाल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांनतर त्या परदेशात अभ्यासासाठी […]
नवी दिल्ली, दि. 6 : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजू झाल्या आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांनतर त्या परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.
त्यापूर्वी विदर्भ विकास बोर्डच्या तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर येथील आयुक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी साभांळला आहे. यासह महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.