महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा परिसरात वृक्षारोपण
Summary
महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा परिसरात वृक्षारोपण नागपूर महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा येथील स्काऊट गाईड पथक व वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. भानेगाव, सिंगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि 28 जुलै रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मणजी राठोड, पर्यवेक्षक […]

महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा परिसरात वृक्षारोपण
नागपूर महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा येथील स्काऊट गाईड पथक व वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. भानेगाव, सिंगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि 28 जुलै रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मणजी राठोड, पर्यवेक्षक श्री प्रमोदजी ईखे, शिक्षक श्री तेजराव बागडे, श्री किशोर पाटील, श्री सुभाष गोस्वामी व स्काऊटर श्री संजीव डी शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी 20 वेगवेगळ्या झाडांचे रोपण करण्यात आले. दरवर्षी होत असलेल्या वृक्षसंवर्धनाने शाळेचा परिसर हिरवागार झालेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपनाचे महत्त्व विषद करून वेगवेगळ्या झाडांची माहिती व उपयोग सांगितले. शाळेतील स्काऊट गाईड्स नी वृक्षारोपण सोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वतःवर घेतली. वृक्षारोपणसाठी खड्डे व पाण्याची व्यवस्था स्काऊटर श्री संजीव शिंदे यांनी स्काऊट मार्फत करून घेतली व सर्वांचे आभार मानले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यातआली.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क