नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न!

Summary

खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दि 23 जूनला साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री अरूण वडस्कर , प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती सदस्य श्री दामोदरजी हाते, तर विशेष अतिथी म्हणून ग्रा पं चिचोलीच्या सरपंचा श्रीमती […]

खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दि 23 जूनला साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री अरूण वडस्कर , प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती सदस्य श्री दामोदरजी हाते, तर विशेष अतिथी म्हणून ग्रा पं चिचोलीच्या सरपंचा श्रीमती मीनाक्षीताई तागडे, ग्रा पं सदस्या श्रीमती गाठींबांधे, श्रीमती पानतावणे, ग्रा पं सदस्य श्री अजय सहारे, पोलीस इन्स्पेक्टर श्री खाडे, प्रा आ केंद्र चिचोलीचे कर्मचारी श्री खोब्रागडे, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री चंद्रशेखर लिखार, प्रा श्री टेकाडे इ मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता. सर्व नवीन विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या कागदावरील निष्पर्ण झालेल्या झाडाच्या प्रतिकृतीला विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे बोटाचे ठसे लावून झाड पुनर्जीवित हिरवेकंच केले. हा प्रसंग मनमोहक होऊन विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेला. कार्यक्रमात पोलीस इन्स्पेक्टर श्री खाडे, सरपंचा श्रीमती तागडे, उपमुख्याध्यापक श्री लिखार, मुख्याध्यापक श्री वडस्कर, इ नी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत मोलाचे मार्गदर्शन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री अभय पुल्लीवार यांनी तर आभारप्रदर्शन श्री विजय टेकाडे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *