महाराष्ट्र विद्यालयात वृक्षारोपण संपन्न !
Summary
खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही दि 26 जुलै शनिवारला वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षीच्या वृक्षारोपण मुळे शाळेचा संपूर्ण परिसर हिरवाकंच झालेला आहे. तत्पूर्वी वृक्षारोपणच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री अरुणजी वडस्कर, प्रमुख पाहुणे म्हणून […]
खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही दि 26 जुलै शनिवारला वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षीच्या वृक्षारोपण मुळे शाळेचा संपूर्ण परिसर हिरवाकंच झालेला आहे. तत्पूर्वी वृक्षारोपणच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री अरुणजी वडस्कर, प्रमुख पाहुणे म्हणून WCL चे नागपूर विभागाचे जनरल मॅनेजर श्री संजय मिश्रा, विशेष अतिथी म्हणून महाजेनकोचे उपमुख्य अभियंता श्री नारायण राठोड, WCL चे उपविभागीय मॅनेजर श्री पंकज सिंग, उपप्राचार्य श्री चंद्रशेखर लिखार, प्रभारी पर्यवेक्षक प्रा विजय टेकाडे, शिक्षक प्रतिनिधी श्री अभय पुल्लीवार, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवशी एक तरी झाड लावून ते जगवावे असा संदेश प्रस्ताविकेतून श्री चंद्रशेखर लिखार यांनी दिला. आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देत “एक पेड,, माँ के नाम” असा नारा याप्रसंगी पाहुण्याच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात देण्यात आला. याप्रसंगी महाजेनको तर्फे दर महिन्याला झाडे पुरविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.प्राचार्य श्री अरुणजी वडस्कर यांनी पर्यावरनाचे महत्त्व स्पष्ट करीत ” पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा” असा मोलाचा संदेश दिला. वृक्षारोपणच्या सेल्फी पॉईंट मध्ये पाहुण्यासह विद्यार्थ्यांनी फोटो काढत ” झाडे लावा -झाडे जगवा” असा संदेश देत झाडे जगविण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे स्काऊटर व सहाय्यक शिक्षक श्री संजीव शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा श्री विजय टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
