महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांचा —————————————— निरोप समारंभ संपन्न! —————————
Summary
खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या यशस्वीतेसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षपद शाळेचे उपप्राचार्य श्री चंद्रशेखर लिखार, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री पद्माकर राऊत, विशेष अतिथी म्हणून शिक्षक प्रतिनिधी श्री अभय पुल्लीवार, […]
खापरखेडा: येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या यशस्वीतेसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षपद शाळेचे उपप्राचार्य श्री चंद्रशेखर लिखार, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री पद्माकर राऊत, विशेष अतिथी म्हणून शिक्षक प्रतिनिधी श्री अभय पुल्लीवार, जेष्ठ शिक्षिका श्रीमती नांदेकर, जेष्ठ शिक्षक श्री तेजराव बागडे, श्री गुणेश्वर गजभिये,यांनी स्थान भूषविले. इ. 10 वीचे वर्षे जीवनाला कलाटणी देनारे असून आताच आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी कसे व्हावे याचे विविध उदाहरणे देत मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शाळेतील आठवणींना उजाळा दिला व शाळेतील शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शाळेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे वचन विद्यार्थ्यांनी दिले. यात विविध क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समारंभाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य श्री अरुण वडस्कर, शिक्षक श्री संजीव शिंदे, श्री सुनिल तांबडे, श्री मिलिंद डोंगरे, श्री धैर्यशील सुटे, श्री विनोद बागडे, श्री धर्मेंद्र सूर्यवंशी, श्री मनोज गायकवाड तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजन घेऊन आनंद द्विगुणीत केला.
