महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेकरिता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणी सुधारित कार्यप्रणाली
Summary
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतआयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परिक्षेकरिता चार चुकीच्या उत्तराबाबत एक गुण वजा करण्याबाबत ची नकारात्मक गुणांची पद्दत सन २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली,तदनंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्दत काही बदलासव अवलंबिण्यात आली,सदर कार्यपद्धती चा […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतआयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परिक्षेकरिता चार चुकीच्या उत्तराबाबत एक गुण वजा करण्याबाबत ची नकारात्मक गुणांची पद्दत सन २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली,तदनंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्दत काही बदलासव अवलंबिण्यात आली,सदर कार्यपद्धती चा आढावा घेण्यात आला,वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परिक्षेकरिता यापूर्वी अवलंबिण्यात येत असलेल्या सर्व कार्यपद्धती अधिकर्मित करून यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेकरता खालील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे
१)प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५%किंवा१/४एवढे गुण एकूण गुणामधून वजा/कमी करण्यात येतील,
२)एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रकारची उत्तरे चुकीचे समजन्यात येऊन त्या प्रशांच्या उत्तराकरिता२५%किंवा१/४ एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा /करण्यात येईल
३)वरीलप्रमाणे कार्यपद्धती चा अवलंब करतांना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तरी ती अपूर्ण अंकात राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल,
४)एखादया प्रश्नचे उत्तर अनुत्तरित असेल तर,अश्या प्रकरणी नकारात्मक गुणांची
पद्धत लागू असणार नाही,
सूचना/टीप १)उपरोक्त कार्यपद्धती आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षेकरीता लागू राहील,
२)सदर कार्यपद्धती यापुढे जाहिर होणाऱ्या सर्व लेखी परीक्षा निकालाकरिता लागू राहील,
३)आयोगाच्या संकेत स्थळावरील संबंधित परीक्षांचा परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील तोपर्यंत उपरोक्त कार्यपद्धती नुसार कार्यवाही करण्यात येईल,
सहसचिव
परीक्षा पूर्व
महाराष्ट्र लोकसेवा आयोग