महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित

Summary

मुंबई, दि. २३ : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे तीन वर्षांचे […]

मुंबई, दि. २३ : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे तीन वर्षांचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.

बांद्रा येथील रंगशारदा नाट्यमंदिरात आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा आमदार आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, अभिनेता आशुतोष राणा, मनोज जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखकांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

यावेळी सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या तीन वर्षातील विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॅा. विकास दवे, चित्रा मुद्गल, डॉ. कन्हैया सिंह यांना तर डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॉ. अनिल मिश्र, आशुतोष राणा, सुधीर पराडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासह विविध प्रकारातील पुरस्कार प्रदान करून पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *