चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना मार्फत सात कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय…

Summary

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर येथील एम. /एस. क्रिसेंट एंटरप्राइजेस या आस्थापनेत मेंटेनन्स ऑफ हायड्रोलिक सिस्टम सी .एच .पी.- डी, संच आठ- नऊ या कंत्राटामध्ये 1] संतोष रमेश भुरे 2]सचिन लक्ष्मण वटे 3] रवी संजय पोरते 4] विनोद सुदर्शन […]

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर येथील एम. /एस. क्रिसेंट एंटरप्राइजेस या आस्थापनेत मेंटेनन्स ऑफ हायड्रोलिक सिस्टम सी .एच .पी.- डी, संच आठ- नऊ या कंत्राटामध्ये 1] संतोष रमेश भुरे 2]सचिन लक्ष्मण वटे 3] रवी संजय पोरते 4] विनोद सुदर्शन धोटे 5] इरफान इस्माईल शेख 6] वनसिंग बंडू ठाकरे 7] धनराज गुलाब बोरीकर हे सात कंत्राटी कामगार गेल्या सात-आठ वर्षा पासून काम करत असून एम. /एस. क्रिसेंट इंटर प्राईजेस यांनी 1 एप्रिल 2024 पासून लागु करण्यात आलेल्या 19% मूळ वेतनात पगारवाढ पासून वंचित ठेवले होते. या संदर्भात सात कामगारांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना युनियनचे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद पि.देवगडे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर लगेच भाई सदानंद पि.देवगडे यांनी एम./एस.क्रिसेंट एंटरप्राइजेस विरूद्ध महाजनको प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.सदर तक्रारी च्या अनुषंगाने दि.18/03/2025 ला दूपारी 4:30 वाजता झेप सभागृह ,प्रशासकीय ईमारत येथे बैठक घेण्यात आली.त्या बैठकीत प्रामुख्याने मा.शिंदे साहेब [उपमुख्य अभियंता (प्रशा.)] ,मा.उमरे साहेब [उपमुख्य अभियंता] ,मा.वंजारी साहेब [ कल्याण अधिकारी] ,मा.कोपटे मॅडम [सहाय्यक कल्याण अधिकारी] व ईतर माननीय अधिकारी तसेच गैर अर्जदार एम. एस.क्रिसेंट एंटरप्राइजेस व सात कामगार तसेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद पि. देवगडे, भाई सुभाषसिंग बावरे [ केंद्रीय प्रभारी ] ,भाई विवेकानंद मेश्राम [शाखा अध्यक्ष ] ,भाई डोमेश्वर धपाडे [जिल्हा सचिव] ,भाई दिपक बेलगे [ जिल्हा उपाध्यक्ष ] ,भाई सचिन वटे [ शाखा सचिव ] ,भाई दिवाकर डबले [जिल्हा संघटक ] ,भाई सागर किन्नाके [ जिल्हा कार्याध्यक्ष ],भाई सुरज शेंडे [ शाखा सहसचिव ] यांच्या उपस्थितीत महाजनको प्रशासनाकडून सात कामगारांना 1 एप्रिल 2024 पासून मूळ वेतनात झालेली पगारवाढ एरीयस तात्काळ अदा करण्याचे निर्देश देण्यात आले .त्या निर्देशानुसार गैर अर्जदार एम.एस. क्रिसेंट एंटरप्राइजेस यांनी सात कामगारांच्या बॅंक खात्यात 19% मूळ वेतन पगारवाढ एरीयस दि.21/04/2025 ला अदा करण्यात आला व संघटनेकडून या सात कामगारांना न्याय मिळाला.त्यामुळे या सात कामगारांनी दि.23/04/2025 ला मेजर गेट समोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व आभार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाई निखिल गुरूनुलेजी यांना पाचारण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद पि.देवगडे व केंद्रीय प्रभारी भाई सुभाषसिंग बावरे यांनी संघटना कामगारांवर कंत्राटदार यांच्या मार्फत होत असलेले अन्याय खपवून घेणार नाही .तळागाळातील कामगारांना न्याय मिळवून देण्यास संघटना वचनबद्ध आहे असे आश्वासन कामगारांना संबोधित करतांना दिले. तसेच संघटने मार्फत महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर च्या सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार मानण्यात आले.कामगारांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचा विजय असो असा जयघोष केला व सभा संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *