आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.५१ टक्के दराने परतफेड

Summary

मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या अदत्त शिल्लक रकमेची 10 सप्टेंबर 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 11 सप्टेंबर 2023 ला सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नेांदणीकृत […]

मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या अदत्त शिल्लक रकमेची 10 सप्टेंबर 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 11 सप्टेंबर 2023 ला सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नेांदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतीतल प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा कूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

विकास कर्जच्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत. रोखेधारकांनी रोखे मुखांकित ठिकाणी अथवा नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावीत, असे वित्तिय सुधारणाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *