BREAKING NEWS:
आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

Summary

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य […]

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे.

या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांक, दुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांक, तिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,०००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी कळविले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *