महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या सर्व योजना तात्काळ बंद करणेबाबत …
Summary
प्रति, मा.श्री. देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय: महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या सर्व योजना तात्काळ बंद करणेबाबत … माननीय महोदय, महाराष्ट्र शासन हे जनकल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजनांची निर्मिती करीत असते यासाठी सरकारचा मोठा आर्थिक खर्च होत असतो. सदर […]

प्रति,
मा.श्री. देवेंद्र जी फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय: महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या सर्व योजना तात्काळ बंद करणेबाबत …
माननीय महोदय,
महाराष्ट्र शासन हे जनकल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजनांची निर्मिती करीत असते यासाठी सरकारचा मोठा आर्थिक खर्च होत असतो. सदर योजनांची जनतेला माहीती व्हावी यासाठी शासनाच्या तिजोरीतुन जाहीरातबाजी केली जाते. यामध्ये होर्डिंग्स, टीव्ही जाहिरात, वर्तमानपत्र जाहिरात अशा अनेक माध्यमातून सरकार भरमसाठ खर्च करीत आहे.
सरकारी योजना मिळवुन देतो यासाठी आज अनेक सरकारी कार्यालयात दलालांचा सूळसुळाट झाला आहे, किंबहुना सरकारने भ्रष्टाचार्यांना अभय दिले आहे की काय? अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा डोंगर झाला असुन, जनता सुद्धा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे. असे असताना वरील योजना म्हणजे नाका पेक्षा मोती जड अशी परिस्थिती दिसुन येत आहे.
वरील सर्व योजना तात्काळ रद्द करुन, महाराष्ट्रात रोजगार निर्माण करावा आणि प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला नोकरी मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी तसेच जीवनावश्यक वस्तुंचे भाव नियंत्रणात आणुन, महागाई कमी करण्यावर भर द्यावा, हि विनंती.
धन्यवाद,
आपला नम्र,
डॉ.संजय कांबळे- बापेरकर
दि. 21-02-2025
सायन कोळीवाडा, मुंबई- ३७.
मो.9820111665.