महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Summary

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करणे, वेतन आयोगाची थकबाकी देणे यासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी  सांगितले. एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी […]

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करणे, वेतन आयोगाची थकबाकी देणे यासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी  सांगितले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांच्या विविध विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव ई रविंद्रन, वित्त विभागाचे संचालक सिताराम काळे, उपसचिव राजेंद्र गैगने, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश मंत्री गजानन गटलेवार, दशरथ पिपरे, माधव लोहे, अनिल तळेले, बाजीराव सोनवणे, व्ही.के.पांडव, व्ही.जी.शिरसाठ यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *