महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र नागपूर येथील अठरा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण

अमर वासनिक/न्युज एडिटर
काल दिनांक १८-०३-२०२३ रोजी उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडी, नागपूर आयोजित महाराष्ट्र उद्योग व व्यापार गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/ जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता निःशुल्क प्रशिक्षणाचा शेवट चा दिवस होता.
प्रस्तुत प्रशिक्षणाचे आयोजन हे दिनांक २८-०२-२०२३ ते दिनांक १८-०३-२०२३ पर्यंत होते. व दिनांक १८-०३-२०२३ ला प्रशिक्षणार्थी यांच्या निरोपसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत एमसीइडी च्या प्रशिक्षणार्थी निरोप समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष एमसीइडी चे नागपूर विभागीय अधिकारी श्री आलोक मिश्रा हे होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना निरोप देताना म्हटले की येथे प्रवास आता सुरू झालेला असून यशस्वी उद्योजगतेकडे वाटचाल करण्याविषयी शुभेच्छा दिल्या. एमसीईडी संस्थेचे नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री हेमंत वाघमारे सर यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थी यांना निरोप देताना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून यशस्वी उद्योजिका सौ सुप्रिया कुर्वे मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुर्वे साहेब, श्री वैभव टाकले सर, उपस्थित होते व यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सूत्र संचालन श्री अजय कुमार खोब्रागडे यांनी केले. नागपूर बॅच चे प्रशिक्षणार्थी यांनी एमसीइडी ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट म्हणून दिला. आणि एमसीइडी येथील परिसरा साठी एक शोभेचे रोपटे आणि जांभूळ फळाचे रोपटे भेट म्हणून दिले. नंतर एमसीईडी नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री हेमंत वाघमारे सर, श्री वैभव टाकळे सर आणि श्री रोशन मानकर सर यांना नागपूर ग्रुप च्या वतीने मौल्यवान भेट वस्तू देण्यात आल्या.
नंतर वृक्षारोपण करण्यात आले. प्रशिक्षणार्थी कुमार सुमित चौधरी, निखिल डोंगरे, प्रफुल रामटेके, प्रशिल मोडक, अजिंक्य दिवे, हर्ष तुपे, संकेत मनपिया, उत्कर्ष कानोडे, आशिष कोसारे, वैभव फोपरे, आकाश बर्वे, मयुरेश पाटील, सचिन कांबळे, रोहित मोटघरे, धम्यक वैद्य, प्रमोद मांडवे, कुमारी दिव्यांशू कांबळे, चकार पाटील, ईशा गजभिये, सुवर्णा रंगारी, अभिदा मेंढे, गुंजन खोब्रागडे, वैशाली मेश्राम, बबिता घुबडे, रोशनी मेश्राम, गुंजन खोब्रागडे, नलिनी शेंडे, वैशाली मेश्राम आणि इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शन म्हणून श्री वैभव टाकळे सर आणि श्री रोशन मानकर सर यांनी केले.
आभार प्रदर्शन नागपूर बॅच चे प्रशिषणार्थी कुमार सुमित चौधरी यांनी केले. आणखी इतर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते.