महाराष्ट्र अंनिस तर्फे महामानवाला अभिवादन
Summary
नागपूर- (प्रतिनिधी – १४/४/२०२३) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागपूर जिल्हा अध्यक्ष मा. जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन आदरांजली मनोगत व्यक्त केले. प्रत्येकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे कृती करणे आज आवश्यक असल्याचे मत जगजीत […]
नागपूर- (प्रतिनिधी – १४/४/२०२३) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागपूर जिल्हा अध्यक्ष मा. जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन आदरांजली मनोगत व्यक्त केले. प्रत्येकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे कृती करणे आज आवश्यक असल्याचे मत जगजीत सिंग यांनी व्यक्त केले.
यावेळी विवेक जागर प्रकाशनाचे पुस्तक विक्री व अंनिस सभासद नोंदणी स्टॉल लावून मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रधान सचिव विनोद उलीपवार, जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे, उत्तर नागपूर शाखा कार्याध्यक्ष मंजुश्री फोपरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अशोक कोल्हटकर, विजय गुरव, स्वप्निल भगत, डॉ. अहिल्या रंगारी, धनपाल वाघमारे उपस्थित होते.
आपला स्नेहांकित
गौरव आळणे
जिल्हा कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अंनिस, नागपूर
मो. 8600145219
gauravalne609@gmail.com
