महाराष्ट्र अंनिसचे संघटनात्मक बांधणी प्रशिक्षण शिबिर ६, ७ मे रोजी वर्धेत सहभागाचे आवाहन
नागपूर – शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने २०२३ ते २०२४ या कालावधी साठी निवड झालेल्या राज्यभरातील नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा प्रधान सचिव यांचे साठी निःशुल्क संघटनात्मक बांधणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वर्धेतील नवभारत अध्यापक विद्यालयात येत्या शनिवार, रविवार दिनांक 6,7 मे २०२३ रोजी करण्यात आलेले आहे.
प्रशिक्षण शिबिर संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागासाठी आयोजित करण्यात आले असून या शिबिरात तज्ञ प्रशिक्षक म्हणून राज्य कार्याध्यक्ष मा. माधव बावगे, लातूर, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार वर्धा ,मा. डाॅ. ठकसेन गोराणे, नाशिक, राज्य सरचिटणीस मा. विनायक साळवे, शहादा, मा. संजय शेंडे, नागपूर, मा. बबन कानकिरड, अकोला, राज्य प्रशिक्षण विभागाचे प्रमुख मा. सुरेश बोरसे, धुळे जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे हे लाभले असून दोन दिवसीय सत्रात संघटना मजबूत व अधिक क्रियाशील कशी होईल, शाखा निर्माण कशा कराव्यात त्या लिड शाखा, क्रियाशील, शाखा उपक्रमशील शाखा कशा कराव्यात यासाठी करावयाचे प्रयत्न, कार्यक्रम उपक्रम राबवितांना घ्यावयाची काळजी, कार्यकर्त्यांचे मानसिक, सामाजिक भरण पोषण, कार्यकर्त्याला प्रगल्भ करण्यासाठी करावयाचे प्रयत्न अशा विविध विषयांवर शनिवार रविवार विविध एकूण १४ सत्रात मांडणी होईल तर गटचर्चा त्याचे सादरीकरण, खेळ, नाट्यमय कृतीतून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे.
यासोबतच शनिवार चे पहिले उद्घाटनाचे सत्र सकाळी १० ते ११ असे होणार असून याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी व ठक्कर बाप्पा सेवा समाज संस्थेचे सचिव मा. लक्ष्मीनारायण सोनवणे अध्यक्षस्थानी राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून नवभारत अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल गावंडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा. बाबाराव किटे, तालुका अध्यक्ष मा.अरूण चवडे उपस्थित राहतील
शनिवार, रविवार दि. ६ आणि ७ मे, २०२३ रोजी आयोजन करण्यात आलेल्या निःशुल्क या प्रशिक्षण शिबिरात मराठवाडा, खानदेश व विदर्भातील सर्व जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा प्रधान सचिव यांनी तसेच विदर्भातील अकराही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तसेच नागपूर जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे अशा सर्वांनी या दोन दिवसाच्या प्रशिक्षणात दोन्ही दिवस पूर्णवेळ १००% उपस्थित राहावे मात्र पुर्व नोंदणी आवश्यक असून ९४०४८९१७२२ या व्हाॅटस अप नंबरवर नोंदणी करावी असे आवाहन
जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर धंदरे, जिल्हा प्रधान सचिव अशोक खोरगडे व विनोद उलीपवार, आशु सक्सेना, दुर्गा लोंढे, डॉ. कविता मते, डॉ. प्रविण नवखरे, ताराचंद पखिड्डे, बबन गायकवाड, विलास भालेराव, संजय भलमे, जयश्री गाडगे, मंजुश्री फोपरे, चैताली रामटेके, अॅड. कीर्तीमाला जयस्वाल, प्रकाश फंदी, मनोहर कापसे, नलिनी शेरकुरे, पुरुषोत्तम शेरकुरे, अरुणा शेंडे, दीपा चव्हाण, शुभा थुलकर, संजय डांगोरे, प्रशांत पवार, दिगंबर टुले, विवेक गायकवाड, वंदना मेश्राम, अनिल घटे, मनिषा साखरे, संजय बारमासे, दिपक नारनवरे, लता ढोक आदींनी केले आहे. _________________________