महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी रिंगणात उतरलो. ⭕ महाराष्ट्र वाचविण्यासाठी नागरिकांनी कर्तव्य पार पाडावे . ⭕ ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चक्रधर मेश्राम यांचे मत.

Summary

सावली /(सिंदेवाही ) प्रतिनिधी दि.२२/१०/२०२४:- माझी लढाई फक्त बीजेपीशी नसून संघाशी, सर्वोच्च न्यायालयाशी,अदाणी आणि अंबानीशी आहे. म्हणून महाराष्ट्र वाचविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात खंबीर नेतृत्वाखाली उभा आहे . महाराष्ट्रातील जनतेला संविधानिक न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, ही निवडणूक हातात घ्यायची […]

सावली /(सिंदेवाही ) प्रतिनिधी दि.२२/१०/२०२४:- माझी लढाई फक्त बीजेपीशी नसून
संघाशी, सर्वोच्च न्यायालयाशी,अदाणी आणि अंबानीशी आहे. म्हणून महाराष्ट्र वाचविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात खंबीर नेतृत्वाखाली उभा आहे . महाराष्ट्रातील जनतेला संविधानिक न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, ही निवडणूक हातात घ्यायची असा निश्चय केला आहे.
बीजेपीचे षडयंत्र, लोकशाहीशी होत असलेली गद्दारी, महाराष्ट्राशी द्रोह, महाराष्ट्रातील कंपन्या गुजरात ला पळवणारी टोळी, महाराष्ट्रातील जनतेच्या मुलांच्या, युवक युवतींचे रोजगार, नोकऱ्या पळवणारी करंटी टोळी विरुद्ध प्रचार करण्यासाठी, महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात खंबीरपणे उभा आहे.
एकटा महाराष्ट्र देश वाचवू शकतो.
महाराष्ट्रीयन नागरिक होण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे जनतेचे आहे. हे राज्य आपले आहे
महाराष्ट्राचे आपल्यावर अनंत उपकार आहे म्हणून आपण महाराष्ट् वाचविला पाहिजे हे आपले कर्तव्य आहे. असा मोलाचा सल्ला जनसंपर्क दौऱ्यात टीमला दिला.
ब्रम्हपुरी येथे क्षेत्र संयोजक , बूथ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी दिवाळीच्या पूर्वी धान खरेदी केंद्र सुरु करण्यासंबंधी शासनाकडे कडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता याचे फलित झाले आहे . त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा ई पीक ७ /१२ ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे व लवकरच शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन, धानाला बोनस, कृषी पंपाला मुक्त विज सारखे निर्णयातून सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करीत राहायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *