महायुतीच्या अंतर्गत कुरघोळीत कामगारांचा बळी जाऊ देणार नाही . — नगराळे
Summary
” महायुती सरकारचे समर्थक आमदार जोरगेवार यांनी महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचे समर्थनार्थ शिष्टाई करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत कामगारांचे प्रतिनिधींची नागपूर येथे बैठक घडवून आणली , त्यात फडणवीसांनी मागण्यांचे समर्थन करून त्या लवकर मंजूर करण्याचे आश्वासन दिले . व नंतर शिष्टाई […]
” महायुती सरकारचे समर्थक आमदार जोरगेवार यांनी महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचे समर्थनार्थ शिष्टाई करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत कामगारांचे प्रतिनिधींची नागपूर येथे बैठक घडवून आणली , त्यात फडणवीसांनी मागण्यांचे समर्थन करून त्या लवकर मंजूर करण्याचे आश्वासन दिले . व नंतर शिष्टाई करणाऱ्या मार्फत शिंदे गटाला श्रेय जाईल हे लक्षात आल्याबरोबर पूर्णतः घुमजाव करून कामगारांच्या तोंडाला पाने पुसली , हा प्रकार महायुतीतील अंतर्गत कुरघोळीचा असल्याने महाराष्ट्रभर कामगारांचे आंदोलन चिघळले आहे . आता पुढील चार दिवसात जोरगेवारांनी कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा चंद्रापुरात मी हे आंदोलन हातात घेईन , पण कामगारांचा बळी जाऊ देणार नाही ” , असा इशारा वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे यांनी महायुती सरकारला दिला आहे .
मागील आठ दिवसापासून मेजर स्टोअर गेट , चंद्रपूर येथे कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरू आहे , फडणवीसांनी विश्वासघात केल्याची भावना कामगारात निर्माण झाल्याने त्यांचे विरोधात संतापाची लाट पसरली असून कामगारांच्या कृती समितीचे पदाधिकारी ती जाहीर मंचावर व्यक्त करीत आहेत . दिनांक 26 ऑगष्टला कामगारांनी आम. जोरगेवार, नगराळे व गोंगपाचे सयाम यांना पाठिंब्यासाठी पाचारण केले होते , नगराळे यांचे नेतृत्वात सुरेश नारनवरे , पंकज ताळे, विवेक कांबळे, बंडू ठमके, सुभाष ढोलणे, लहू मरस्कोल्हे इ. च्या शिष्टमंडळाने आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला . तदनंतर झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना नगराळे बोलत होते . त्यांनी आपल्या भाषणात जोरगेवारांचा ‘भाजपचे आमदार ‘ असा उल्लेख करणारी गुगली टाकल्याबरोबर जोरगेवारांनी तत्परतेने खंडन करून ते अपक्ष असल्याचे सांगितले , यामुळे सभेत प्रचंड हश्या पिकला . मात्र नगराळेंच्या गुगलीने महायुतीतील कुरघोळी अधोरेखित झाल्याचे स्पष्ट जाणवत होते .
या प्रसंगी जोरगेवार यांनी उतरादाखल तडाखेबाज भाषण करून कामगारांना लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देऊन टाकले . नगराळेनी काही वर्षांपूर्वी येथेच कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, संप पुकारून एक दिवसासाठी पॉवर स्टेशन बंद पाडून कामगारांना न्याय मिळवून दिला होता , त्याचा उजाळा या सभेत झाल्याने जोरगेवारांच्या असो की नगराळेंच्या माध्यमातून असो न्याय मिळण्याची आशा कामगारात निर्माण झाली आहे .