महामार्ग पोलीस मदत केंद्र व्दारे अपघात जख्मी ना मदत करण्याचे प्रात्याक्षिके व मार्गदर्शन
महामार्ग पोलीस मदत केंद्र व्दारे अपघात जख्मी ना मदत करण्याचे प्रात्याक्षिके व मार्गदर्शन
कन्हान : – महामार्ग पोलीस मदत केंद्र रामटेक कॅप टेकाडी जि नागपुर व्दारे यशवंत विद्यालय वराडा येथे द रेसिलिएन्ट फाऊडेशन मुबई चे भुपेंद्र मिश्रा हयानी अपघातात जख्मीना प्राथमिक मदत करण्याविषयी उपस्थित महामार्ग पोलीस, वराडा, टेकाडी चे ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यी, शिक्षकांना प्रात्याक्षिके करून दाखवित मौलिक मार्गदर्शन केले.
बुधवार (दि.१५) डिसेंबर ला महामार्ग पोलीस मदत केंद्र रामटेक कॅप टेकाडी व यशवंत विद्यालय वराडा यांच्या सयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य महा मार्ग पोलीस मदत केंद्र प्रभारी पोउपनि श्री सचिन सेलोकर यांचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी द रेसिलिएन्ट फाऊडेशन मुबई चे संस्थापक मा. भुपेंद्र मिश्रा, मुख्या ध्यापिका किर्ती निंबाळकर, पोसनि गजानन मोटे, पोसनि दिपक क्रांकेटवार, ग्रा प टेकाडी सदस्या सिंधु ताई सातपैसे आदीच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. द रेसिलिएन्ट फाउंडेशन ही संस्था २०१८ पासुन आपत्ती व्यवस्थापन या विषयावर काम करत असुन संस्थेने उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र मध्ये अनेक संस्थाना प्रशिक्षण दिले आहे.त्याचबरोबर पालघर च्या सर्व आश्रमशाळां मध्ये सुरक्षित शाळा, सुरक्षित परिसर या प्रोजेक्टवर काम करत आहेत. सध्या संस्थचे संस्थापक मा. भुपेंद्र मिश्रा हे महाराष्ट्र भर महामार्ग पोली साना प्रशिक्षण देत मुत्युंजय दुत व नागरिकांना अपघा तातील जख्मीना प्राथमिक मदत कार्याविषयी मार्गदर्श नाचे कार्य करित आहे. असे प्रास्ताविकातुन दिपक क्रांकेटवार हयानी मा. भुपेंद्र मिश्रा यांचा परिचय करून दिला. तदंतर मा. भुपेंद्र मिश्रा व सहकारी सिध्देश काजारे, विक्रांत गुप्ता हयानी कुठलिही आपत्तीच्या वेळी किंवा अपघातात जख्मीना प्राथमिक मदत म्हणुन वेळेवर आपल्या जवळपास साधन सामुग्री चा जसे रूमाल, दुपटा व्दारे पटटी बांधुन रक्त प्रवाह थांबविणे, जख्मीना उचलण्या ची पध्दत, स्टेचर नसल्याने चादर, सर्ट, टि सर्ट, बाबु, काठी चा उपयोग करून स्टेचर बनवुन जख्मीना योग्यरित्या दवाखान्यात पोहचविण्या तसेच इतर मदत करण्याच्या पध्दतीचे प्रात्याक्षिके उपस्थित महामार्ग पोलीस कर्मचारी, कन्हान, वराडा, टेकाडी येथील नागरिक, शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांना करून दाखवित मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन सतिश कुथे सर यांनी तर आभार राजेंद्र गभणे सर हयानी व्यकत केले. यावेळी भगवानदास यादव, दिनेश नानवटकर, चोपकर, विशाधर कांबळे, रवींद्र टाले, सेलोकर, मुत्यंजय दुत सह शाळेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा बहु संख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क
9579998535