हेडलाइन

महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार येथे मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण…

Summary

महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार येथे मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण कोंढाळी-वार्ताहर- डाॅ भूषण कुमार उपाध्याय अपर पोलिस महानिरीक्षक (वाहतूक)यांचे संकल्पनेतून मृत्युंजय दूत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व एशियन हायवेज क्र 46वरील मृत्युंजय दूत संकल्पना […]

महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार येथे मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण

कोंढाळी-वार्ताहर-

डाॅ भूषण कुमार उपाध्याय अपर पोलिस महानिरीक्षक (वाहतूक)यांचे संकल्पनेतून मृत्युंजय दूत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व एशियन हायवेज क्र 46वरील मृत्युंजय दूत संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग पोलीस केंद्र खुर्सापार हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व एशियन हायवेज क्र 46 वर कोंढाळी, बाजार गाव, धामना, कारंजा , ठाणेगाव,कळमेश्वर येथील जुने व नवीन मृत्युंजय दूतांची निवड करून त्यांना अपर पोलीस महासंचालक वाहतूक यांचे निर्देशानुसार पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे, सहाय पोलीस निरीक्षक सगणे , यांच्या मार्गदर्शनाखाली दि रिझिलिएंट फाऊंडेशन च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मुंबई येथून आलेले प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा,विक्रांत गुप्ता,सिद्धेश काजोरे,तथा जीवन सुरक्षा प्रकल्पाचे डाॅ राज दिवान व प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी च्या उप केंद्र खुर्सापार चे आरोगय सहायकांनी 38 मृत्युंजय दूतांना कोविड 19च्या दिशा निर्देशांचे पालन करत अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित उपलब्ध होणार्या साहित्यातून डोके, कपाळ, मान, हनूवटी, हात पाय व शरिराच्या अन्य भागात झालेल्या ईजांना कश्या पद्धतीने हाताळावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रत्येक मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. तसेच या कार्य शाळेत सहभागी होनारे मृत्युंजय दुतांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सहाय पोलीस निरीक्षक सगणे व त्यांचा स्टाफ यावेळी

उपस्थित होते.

या प्रसंगी महामार्गावर त्वरित सेवा देणारे मृत्युंजय दूत संजय गायकवाड (कोंढाळी)-डा राज दिवान, व अमन बोरे कळमेश्वर यांचा या प्रसंगी सत्कार ही करण्यात आला.

विंग्ज एन्ड बेरी कंपनी चे जी एम ठवकर यांनी या प्रसंगी महामार्गावरील अपघात प्रवण भागातील मृत्यूंजय दुतांना स्ट्रेचर चे वाटत करण्यात आल्याची माहिती स पो नि सगणे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *