महामार्गावरील लाईट बंद -गंभीर अपघाताची मालिका सुरू!!!! एन एच एआय व अटलांटा बांधकाम कंपणी चे दुर्लक्ष!!! महामार्ग प्राधिकरणाला अर्ज/विनंत्या करूनही दुर्लक्ष!!!! आता! आमदार/खासदारांनी स्वतः घटनास्थळाचे निरिक्षण करावे
Summary
कोंढाळी-वार्ताहर- नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/6 या महामार्गाच्या कोंढाळी पर्यंत 43.08किलो मिटर मार्गाचे चौपदरीकरनाचे बांधकाम बालाजी टोलवेज अटलांटा सडक बांधकाम कंपनी मार्फत बी ओ टी या तत्वावर बांधकाम केले आहे. झालेले बांधकामात कोंढाळी नगर पंचायत हद्दितील सर्व्हिस रोड अपुर्ण […]

कोंढाळी-वार्ताहर-
नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/6 या महामार्गाच्या कोंढाळी पर्यंत 43.08किलो मिटर मार्गाचे चौपदरीकरनाचे बांधकाम बालाजी टोलवेज अटलांटा सडक बांधकाम कंपनी मार्फत बी ओ टी या तत्वावर बांधकाम केले आहे. झालेले बांधकामात कोंढाळी नगर पंचायत हद्दितील सर्व्हिस रोड अपुर्ण आहे. कोंढाळी-वर्धा टी पॉइंट वर रोडरैमलर वर वारंवार सांगूनही पांढरे पट्टे मारलेले नाही.
कोंढाळी येथील कोंढाळी -वर्धा टी पॉईंट चा भाग अपघातासाठी कुख्यात झाला आहे. येथील टी पॉइंट ला अपघात मुक्त करण्यासाठी ब्लाट स्पाट ची पाहणी करून दुर्घटना मुक्त टी पॉइंट करण्यासाठी एन एच ए आय चे वरिष्ठ अधिकार्यांनी स्वतः घटनास्थळाचे निरिक्षण करून योग्य निर्णय घेऊन येथील टी पॉइंट अपघात मुक्त करण्यासाठी
या भागातील आमदार चरण सिंह ठाकूर व खासदार शामकुमार बर्वे त्याच प्रमाणे कोंढाळी नगर पंचायतीचे सी ओ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष नामदार नितीन गडकरी यांच्या सोबत बैठक लाऊन निदान कोंढाळी नगर पंचायत हद्दीतील महामार्गाचे अपूर्ण कामे(सर्व्हिस रोड, ड्रेनेज, सोनेगाव पर्यंत हायवे लाईट कोंढाळी वर्धा टी पॉईंट वर हायमास्ट तसेच रोडरैमलवर कैट आय व पांढरे पट्टे लावणे) पुर्ण करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
अशी मागणी येथील रूग्णवाहीका (वाहन) चालक संजय गायकवाड तसेच सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, स्वप्निल व्यास, संजय राऊत, कमलेश गुप्ता, आकाश गजबे, नितीन ठवळे,प्रशांत खंते,प्रज्वल धोटे, बब्लू बिसेन, निखील जयस्वाल, चंद्रशेखर चरडे,परिमल हिंगणकर रजा पठाण तसेच युवकांनी केली आहे.