महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Summary

मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, […]

मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ.जी.आय. विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत तसेच सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व अनुज्ञप्त्या तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ई – विभाग, मुंबई शहर याच्या कार्यक्षेत्रातील फक्त वरळी भागातील सर्व अनुज्ञप्त्या या मंगळवार ६ डिसेंबर २०२२ रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात याव्यात. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री इ. करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *