महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांनी प्रज्ञा शील करुणा ही त्रिसूत्री अंगीकारावी….…प्राचार्य जे.डी.पठान
Summary
अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल,प्रा.टी.एस.बिसेन,प्रा. नंदा लाडसे,वरिष्ठ शिक्षक लोकमित्र खोब्रागडे, कुंडलिक […]
अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल,प्रा.टी.एस.बिसेन,प्रा. नंदा लाडसे,वरिष्ठ शिक्षक लोकमित्र खोब्रागडे, कुंडलिक लोथे, माधुरी पिल्लारे,सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत लोणारे यांची होती. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रज्ञा,शील, करुणा याबाबत माहिती देताना प्राचार्य जे.डी. यांनी विद्यार्थ्यांनी शीलवान असावे तसेच त्यांच्या मनात दुसऱ्यांच्या प्रती करूणा असावी असे प्रतिपादन केले तर प्रत्येक व्यक्तीने चारित्र्य निष्कलंक राखावे, व्यसनापासून दूर रहावे, स्वतःचे चरित्र स्वत: घडवावे असे मार्गदर्शन केले. महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून शाळेत भीमगीत स्पर्धा तसेच भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर भाषन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीची विद्यार्थिनी संचिता शहारे तर आभार लीना ढोमणे नी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.