महाराष्ट्र हेडलाइन

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा समारोप सोहळा संपन्न

Summary

कढोली (ता.चामोर्शी) – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित विशेष शिबिराचा समारोप कार्यक्रम 20 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला. या शिबिरामध्ये ‘युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरेसी’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन […]

कढोली (ता.चामोर्शी) – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित विशेष शिबिराचा समारोप कार्यक्रम 20 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला. या शिबिरामध्ये ‘युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरेसी’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी भूषवले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून एस. चंद्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता लोखंडे, सरपंच जितेंद्र हुलके, कढोली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामण नागापुरे, पोलिस पाटील संगीता इजमनकर, मुख्याध्यापक कोडापे सर, तसेच डॉ. ढवळे (कला महाविद्यालय, गोंडपिपरी) उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वाखाली 15 जानेवारी ते 21 जानेवारी 2025 दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कढोली येथे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. त्यांनी शिबिरामध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली, आरोग्य शिबिर, पशुचिकित्सा शिबिर,बौद्धिक, सांस्कृतिक उपक्रमांबाबत अहवाल सादर केला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य, श्री. दीपक खोब्रागडे, गावकरी, पत्रकार गजानन जी पुरम व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन शिबिरार्थी कु. मोनिका मुंजनकर हिने केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी कु. प्रीतम आदे हिने मानले.

कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *