महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे संविधान सन्मान महोत्सवाचा आयोजन
Summary
आष्टी: महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज, 24 फेब्रुवारी 2025 रोजी “संविधान सन्मान महोत्सव” निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधानाविषयी निबंध लेखन स्पर्धा, […]

आष्टी: महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज, 24 फेब्रुवारी 2025 रोजी “संविधान सन्मान महोत्सव” निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय संविधानाविषयी निबंध लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा यासारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. खुणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी संविधानाच्या महत्त्वावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा रवी गजभिये यांनी केले तर आभार प्रा बोबाटे यांनी मानले.यावेळी डॉ. मुसने, डॉ. शास्त्रकार, डॉ. कोरडे आणि प्रा. गभने मॅडम यांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांसोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या महत्त्वावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली, तसेच त्यांना संविधानाचे आदर करण्याचे महत्त्व पटवून दिले गेले.