महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेवर व्याख्यान
Summary
चामोर्शी तालुक्यातील – आष्टी (ता. 23 सप्टेंबर 2025) : महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे “देशाला एकसंघ करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी भूषविले तर […]
चामोर्शी तालुक्यातील –
आष्टी (ता. 23 सप्टेंबर 2025) : महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे “देशाला एकसंघ करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुसने उपस्थित होते. व्याख्यानात प्रा. ज्योती बोबाटे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर काळात देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंध बनविण्यात दिलेल्या योगदानाचे सविस्तर विवेचन केले.
या प्रसंगी डॉ. शास्त्रकार, डॉ. खूने, डॉ. पांडे, डॉ. कोरडे, प्रा. सालूरकर मॅडम, प्रा. गभणे मॅडम तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवी गजभिये यांनी केले तर उपस्थितांचे आभार वैष्णव यांनी मानले. या व्याख्यानाला विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘लौहपुरुष’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांच्या कार्याची आणि भारताला एकसंघ राष्ट्र बनविण्यातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेची जाणीव करून देण्यात आली.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो.7057785181
