महसूल विभागाच्या संगणमताने वलनी चौरस येथे सर्रास रेतीची तस्करी पत्रकार परिषदेत उपसरपंचाचा आरोप
प्रतिनीधी पवनी
पवनी तालुक्यातील वलनी चौरस येथे महसूल विभागाच्या संगणमताने वलनी चौरस येथील रेती घाटावर रात्रं दिवस रेतीची तस्करी होत असल्याचे आरोप नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपसरपंच सचिन तिघरे यांनी केले आहेत. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीची रेती विदर्भात प्रसिद्ध असून पवनी तालुक्यात वलनी येथील रेती घाटावर रेतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन सुरू असून सायंकाळी सात ते रात्रभर व सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत रेतीचे उत्खनन करून टिप्परच्या माध्यमातून रेती विदर्भात सर्वदूर पोहोचवल्या जाते. परंतु वलनी या गावांमध्ये तलाठी कार्यालय असून सुद्धा याकडे तलाठी दुर्लक्ष करत आहे. असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. यामध्ये महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तर सहभागी नाहीत ना अशी शंका निर्माण होत आहे
वलनी येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना यासंबंधी वारंवार तक्रार करून सुद्धा कोणती कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे हे सर्व कार्य वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने तर होत नाही ना या आरोपाला बळकटी मिळत आहे. रात्री सात वाजेपर्यंत टिप्पर मध्ये रेती ओव्हरलोड भरली जाते रात्रभर या टिप्परची व ट्रॅक्टरची आवक जावा गावातून होत असल्यामुळे लोकांचा निद्रानाश होत आहे. त्यामुळे या गावातील लोकांना विविध आजाराने ग्रासलेले असून मानसिक अस्वस्थता पसरलेली आहे. त्याच प्रकारे ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीमुळे वैनगंगा नदीवरून गावात पाणीपुरवठा करण्यासाठी जी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे तिला सुद्धा तळे जाऊन ठिकठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. ओव्हरलोड टिप्पर व ट्रकमुळे गावातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रेती तस्कराने यापूर्वी ग्रामपंचायत सरपंचावर ट्रॅक्टर चालवण्याच्या प्रयत्न केला होता. त्यामध्ये माजी सरपंच थोडक्यात बचावले होते ग्रामपंचायत उपसरपंच यांनी तहसीलदार यांना वारंवार फोन करून सुद्धा त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर तक्रार कुणाकडे करावी. असा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झाला आहे. रेती तस्करामुळे गावकऱ्यांचा झालेला निद्रानाश, गावातील खड्ड्यांची दुरावस्था व ओवरलोड टिप्पर व ट्रॅक्टर मुळे होणाऱ्या अपघाताचा धोका बघता यावर ताबडतोब प्रतिबंध करावा अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच सचिन तिघरे, शंकर जांभुळकर, पुरुषोत्तम शेलोकर व चंद्रगुप्त मेंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
रेती तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून गावातील रस्ते ओवरलोड वाहतुकीमुळे दबल्या जात आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही ही रेतीची होणारी छोटी वाहतूक ताबडतोब थांबवून गावातील लोकांना होणारा त्रास थांबावा अन्यथा आंदोलन केले जाईल
अशी चेतावनी वत्सला तिघरे सरपंच ग्रामपंचायत वलनी चौरस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.