महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महसूल पंधरवडा अंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमात सहभागी होण्याचे मुंबई उपनगरातील माजी सैनिकांना आवाहन

Summary

मुंबई, दि 2 : महसुल पंधरवडानिमित्त मुंबई उपनगर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम १० ऑगस्ट २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांर्गत महसूल संबंधित समस्यांचे निराकरण करता येणार आहे. मुंबई […]

मुंबई, दि 2 : महसुल पंधरवडानिमित्त मुंबई उपनगर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम १० ऑगस्ट २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांर्गत महसूल संबंधित समस्यांचे निराकरण करता येणार आहे. मुंबई उपनगरात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागामध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुंटूंबिंयाना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत प्राप्त अर्जावर सत्वर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.

तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी – कर्मचारी यांना घरासाठी शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील. या अनुषंगाने मेजर प्रांजळ जाधव (नि) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी सर्व माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांना संबधित महसूल कार्यालयात  10 ऑगस्ट 2024 रोजी उपस्थित राहून आपले महसूल संबधित प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन सैनिक कल्यान कार्यालयाने केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *