नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महसुल अधिकारी कार्यालयांना हक्काची जागा काटोल/नरखेड तालुक्याती ग्राम महसुल अधिकारी व राजस्व मंडळ अधिकारी कार्यालयांना मिळणार हक्काची ईमारत 49 तलाठी/10 राजस्व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी 10.51₹कोटी ची प्रशासकीय मान्यता आमदार चरण सिंह ठाकूर

Summary

काटोल/नरखेड -कोंढाळी-: गावांचे विकासासाठी तसेच महत्त्वाचे कामासाठी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)हे पद फारच महत्त्वाचे आहे,. संबंधित गावात त्यांचे कार्यालय असावे , या साठी काटोल चे आमदार चरण सिंह ठाकूर प्रयत्नशील होते. आता! काटोल/नरखेड तालुक्यातील भाड्याच्या घरात राहत असलेल्या ‌ ग्राम […]

काटोल/नरखेड -कोंढाळी-:
गावांचे विकासासाठी तसेच महत्त्वाचे कामासाठी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)हे पद फारच महत्त्वाचे आहे,. संबंधित गावात त्यांचे कार्यालय असावे , या साठी काटोल चे आमदार चरण सिंह ठाकूर
प्रयत्नशील होते. आता!
काटोल/नरखेड तालुक्यातील भाड्याच्या घरात राहत असलेल्या ‌ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयांना आता हक्काच्या इमारती मिळणार आहेत.ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयाच्या शासकीय इमारतीसाठी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. लवकरच काटोल/ नरखेड तालुक्यातील 49ग्राम महसुल अधिकारी (तलाठी), व 10राजस्व मंडळ कार्यालय स्वतःच्या इमारतीत दिसून येणार आहेत. काटोल तालुक्यातील 43 कार्यालय आहेत त्यापैकी 24 तलाठी, व04राजस्व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी 04.46कोटी रू. तसेच नरखेड तालुक्यातील 25 महसुली अधिकारी (तलाठी) व 06राजस्व मंडळ अधिकार्यांचे कार्यालयासाठी 05.05रू. एकूण 10.51कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे काटोल/नरखेड तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी ‌व राजस्व मंडळ अधिकार्यांकरीता आता शासकीय इमारती लवकर उभ्या राहणार आहेत. काटोल नरखेड/ महसुल अधिकारी व राजस्व मंडळ निरिक्षक कार्यालयासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे मागणिला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे राजस्व मंत्री तसेच ‌नागपुर जिल्हा पालकमंत्री यांनी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी लवकरच अंदाजपत्रकाच्या किंमतीत दहा कोटी 51 लाख एवढी आहे. नागपूर सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडून प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात आलेला महसुली अधिकारी व राजस्व मंडळ अधिकारी कार्यालय इमारतींच्या बांधकामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महसुल अधिकारी हे गावाचे दृष्टीने महत्त्वाचे शासकिय पद आहे. संबंधित अधिकारी ‌गावचे नागरिकाना सहजतेने कार्यालयात उपलब्ध असावी यासाठी त्यांना हक्काची जागा असावी यासाठी सातत्याने आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला व राजस्व मंत्री यांनी मान्य केला आहे.आता लवकर तलाठी कार्यालय उभे दिसणार आहे. या करिता आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार व राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *