BREAKING NEWS:
हेडलाइन

महत्त्वाची बातमी! रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार

Summary

नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद शिधापत्रिकेसोबत आधारकार्ड सीडिंग (लिंक) करण्याचे काम निगडी परिमंडळ “अ’ व “ज’ कार्यालयीन स्तरावर सुरु आहे. शिधापत्रिका कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जात आहे. नागरिकांकडून शिधापत्रिकेतील काळा बाजार […]

नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद
शिधापत्रिकेसोबत आधारकार्ड सीडिंग (लिंक) करण्याचे काम निगडी परिमंडळ “अ’ व “ज’ कार्यालयीन स्तरावर सुरु आहे. शिधापत्रिका कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जात आहे.
नागरिकांकडून शिधापत्रिकेतील काळा बाजार थांबविण्यासाठी सीडिंग होणे गरजेचे आहे. अन्यथा, थेट रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.
मात्र, केवळ काही शिधापत्रिकाधारकांनी आतापर्यंत आधारकार्ड लिंक केले आहे. त्यामुळे धान्यवितरण बंद झाल्यानंतर एकच खळबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या काही ठिकाणी आधारकार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे काम सुरु आहे.31 जानेवारीला सीडिंग करण्याची मुदत संपत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व राष्ट्रीय अंत्योदय योजनेचा लाभ या माध्यमातून मिळत आहे. केवळ कार्डधारकांची डेटा एंट्री होणे म्हत्वाचे आहे.
थोडक्‍यात नागरीकांची केवायसी केली जात आहे. यामुळे शिधा पत्रिकेवरील दुबार नोंदणी, मयत व्यक्ती, बोगस शिधापत्रिका, स्थलांतरीत कार्डधारक वगळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शिधा वाटपामध्ये पारदर्शकता येणार आहे.
सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक टळेल. शिवाय कोणीही एजंटगिरी व धान्यात काळाबाजार करू शकणार नाही. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार लिंक होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा वैध मोबाईल क्रमांकच असणे अत्यावश्‍यक आहे.
प्रत्येकी शिधा धारकाला मिळते
गहू – 3 किलो
तांदूळ – 2 किलो
साखर – 1 किलो
नेमके काय घडतेय

पिवळे व केशरी शिधापत्रिका कार्डधारक धान्य मागण्यासाठी गेले असताना सीडिंगच्या प्रक्रियेसाठी धजावत नाही. नागरीकांकडून टाळाटाळ केली जात आहेत. ‘पुढच्या महिन्यात लिंक करू’ असे एकच उत्तर नागरीकांकडून मिळत आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी तोबा गर्दी होण्याची शक्‍यता आहे

ग्रामसेविका संगीता माने यांना कोविड योद्धा सन्मान पुरस्कार; उद्या बठाण येथे सोहळा

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावच्या व बठाण येथे सेवा बजावलेल्या ग्रामसेविका  सौ.संगीता सुभाष माने यांना पृथ्वी कन्ट्रक्शनचा कोविड योद्धा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

बठाण येथे उद्या २६ जानेवारीला कोविड १ ९ योध्दा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पृथ्वी लँडमार्क्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि.चे कार्यकारी संचालक गणेश बेदरे यांनी दिली.
पृथ्वी लँडमार्क अँड डेव्हलपर्स प्रा.लि. सोलापूर या कंपनीमार्फत कोविड १९ आपत्तीमध्ये देशासाठी समाजासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता बठाण गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योध्दा म्हणून आरोग्य क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी,
ग्रामपंचायत , ग्रामसेवक , तलाठी , किराणा दुकानदार , कृषी सेवा केंद्र , स्वस्त धान्य दुकानदार , शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स , पशुवैद्यकीय सेवक अशा विविध क्षेत्रात कोरोना योध्दा म्हणून कार्य केलेल्या योध्दांचा सन्मान उद्या २६ जानेवारीला हनुमान मंदिर बठाण येथे करण्यात येणार असल्याचे गणेश बेदरे यांनी सांगीतले
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *